Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | शस्त्र बाळगण्यास बंदी असताना धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून दुचाकी, कोयता व तलवार जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि.9) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नवीन बीआरटी रोड, म्हस्केवस्ती, रावेत येथे करण्यात आली. (Arrest In Arms Act)

विजय शंकर शर्मा (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश ज्ञानदेव तांबे यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री रावेत पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी म्हस्के वस्ती रावेत येथील नवीन बीआरटी रोडवर एका पल्सर दुचाकीवरुन तीन जण संशयित रित्या जाताना आढळून आले. पोलिसांनी तिघांना थांबवून त्यांची अगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक हजार रुपये किमतीची तलवार आणि पाचशे रुपयांचा लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमित गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लष्करी अधिकार्‍यासाठी फ्लॅट भाड्याने घेण्याचा बहाणा करुन सायबर चोरट्यांनी घातला 20 लाखांना गंडा