Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला तू त्याच्या सोबत का राहतोस अशी विचारणा करुन बेदम मारहाण केली. तसेच सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.26) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथील साई अम्ब्रेला डिस्पेन्सरी येथे घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) सहा जणांना अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत आकाश ब्रह्मदेव नरुटे (वय-23 रा. तक्षशिला हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रतिक आटोळे, राहुल मोहटा, करण चंडालिया, अमोल शिंदे, महेश नायकवडे (सर्वरा. अजंठानगर, चिंचवड), योगेश गालफोडे (रा. देहुरोड, पुणे) यांना अटक केली आहे. तर यासीन शेख, खाली उर्फ सोनु गायकवाड हे फरार असून आरोपींवर आयपीसी 307, 323, 141, 143, 147, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यासीन शेख याचे फिर्यादी यांचा मित्र चेतन गायकवाड याच्यासोबत पूर्वी
भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता.
फिर्यादी चेतन याच्यासोबत दिसल्याने आरोपींनी संगनमत करुन आकाश नरुटे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच चेतन सोबत राहतोस काय, तुला आता सोडत नाही, असे म्हणत त्याला शिवीगाळ केली.
आरोपींनी जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाश याच्या डोक्यात, पाठीवर व कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन
जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”