Pune Pimpri-Chinchwad Crime | गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत कत्तलीसाठी घेऊन जाणारी ‘कुरेशी’ टोळी गजाआड, 13 गुन्हे उघडकीस

0
312
Pune Pimpri-Chinchwad Crime | 'Qureshi' gang of 'Qureshi' gang who used to make cows unconscious by giving them ejection and taking them for slaughter, 13 crimes busted
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri-Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड आयुक्तालाय, पुणे पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण मधील गायींना इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध करून त्यांची कत्तल करून घेऊन जाणाऱ्या टोळीला दिघी पोलीस ठाण्यातील (Dighi Police Station) तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी सहा आरोपींना (Pune Pimpri-Chinchwad Crime) अटक करून एकूण 25 लाख 20 हजार 980 रुपये मुद्देमाल जप्त करून एकूण 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ADV

मोशीन बाबू कुरेशी (वय 28), शाहिद रहेमान कुरेशी (वय 42), मोहम्मद अब्दुल रहमान कुरेशी (वय 20), आशराफ सलमान कुरेशी (वय 32), मोहम्मद आरिफ सलमान कुरेशी (वय 52), सोहेल फारूक कुरेशी (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune Pimpri-Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गायींना बेशुद्ध करत त्यांना कत्तलीसाठी (Slaughter) नेण्याचे प्रमाण वाढले आहे. या बाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना 28 डिसेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंबर प्लेट नसलेली कार संशयित रित्या फिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता आरोपी गाडी सोडून पळून गेले.

गाडीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी गाडीच्या इंजिनाच्या नंबरवरुन गाडी मालकाचा शोध घेतला. त्यावेळी ही गाडी अशोक जगताप यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडे तपास केला असता ही गाडी सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्री झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच ही गाडी मोशीन कुरेशी यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी मोशीन बाबू कुरेशी याचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्यावरून त्याचे साथीदार मोबाईल नंबर प्राप्त केले. तसेच नंबरचे सीडीआर, घटनास्थळ व घटनास्थळाचा परीसरातील डम्प डाटा विश्लेषण करून करून आरोपींचा मीरारोड काशिमीरा माहीम येथे शोध घेऊन आरोपींना अटक केली.

आरोपींकडून तीन मोटार कार एन्जॉय, इनोवा ऍक्सिव्ही महिंद्रा तसेच गुन्ह्यात वापरलेले कोयते सत्तुर
नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन औषधाची बाटली नंबर प्लेट असा एकूण 25 लाख 20 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
यामध्ये दिघी मधील तीन, पिंपरी मधील तीन (Pimpri Police Station), भोसरी मधील दोन
(Bhosari Police Station), देहुरोड (Dehu Road Police Station), वाकड (Wakad Police Station) ,
खेड (Khed Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station) व हडपसर पोलीस ठाण्यातील
(Hadapsar Police Station) प्रत्येकी एक असे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Choubey),
सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया (Joint CP Manoj Kumar Lohia),
अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ1 विवेक पाटील (DCP Vivek Patil),
सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे (ACP Prerna Katte),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Senior Police Inspector Dilip Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने (PSI Sunil Bhadane), पोलीस अंमलदार फलके,
पोटे, कांबळे, जाधव, विधाते, जाधव, नवगिरे, दहिफळे, जाधव, शिंदे, भाग्यश्री जमदाडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Pimpri-Chinchwad Crime | ‘Qureshi’ gang of ‘Qureshi’ gang who used to make cows unconscious by giving them ejection and taking them for slaughter, 13 crimes busted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड