Pune Pimpri Chinchwad Crime | वाकडमध्ये कोयता गँगची दहशत, फिनिक्स मॉलमधील माथाडी कामगारांना मारहाण; 7 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | माथाडी कामगारांना (Mathadi Workers) सहा ते सात जणांच्या टोळक्याने मारहाण करुन दोघांवर कोयत्याने वार करुन जखमी केली. तसेच एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) वाकड येथील फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall) गेट नं. 6 येथे शुक्रवारी (दि.3) दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत लोकेश विनोद लखन (वय-27 रा. खडकी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा ते सात जणांवर 395,397,447,427,506,34, सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माथाडी कामगार असून शुक्रवारी दुपारी ते त्यांचे सहकारी अनिल कांबळे व प्रवीण पारखी यांच्यासोबत गप्पा मारत फिनिक्स मॉल गेट नं. 6 येथे उभे होते. त्यावेळी सहा ते सात जण तोंडाला मास्क लावून गेटमधून आत आले. त्यापैकी एकाने हातातील कोयता लाकडी टेबलावर मारुन हातातील दगडाने गार्ड केबीनची काच फोडली. तसेच सुरक्षारक्षक राजकिशोर याला मारहाण केली.

Advt.

तर दुसऱ्या एका आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन हातातील कोयता हवेत फिरवुन दहशत निर्माण करून
माथाडी कामगारांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन जेसीबीची काच दगड मारुन फोडली.
आरोपींनी फिर्यादी यांचे सहकारी अनिल कांबळे व प्रविण पारखी यांच्या हातावर वार करुन कांबळे
यांच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Terror of Koyta Gang in Wakad, beating
of floor workers in Phoenix Mall; FIR against 7 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा