Pune Pimpri Chinchwad Crime | स्कोडा कारमधून पिस्टलची चोरी, निगडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | घरासमोर सर्वजनिक रोडवर पार्क केलेल्या स्कोडा ऑक्टाविया (Skoda Octavia) कारमध्ये ठेवलेली पिस्तूल (Pistol) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) सोमवारी (दि.6) टेल्कोकपुर सोसायटी निगडी प्राधिकरण येथे रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

याबाबत पवन मनोहरलाल लोढा Pawan Manoharlal Lodha (वय-36 रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) मंगळवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 379 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन लोढा यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल आहे.
लोढा यांनी पिस्तूल एका बॅगमध्ये ठेऊन बॅग कारमध्ये ठेवली होती.
सोमवारी रात्री त्यांनी त्यांची कार सार्वजनिक रोडच्या कडेला पार्क केली होती.
अज्ञात चोरट्याने रात्रीच्यावेळी कारच्या पाठीमागील खिडकीचा काच खाली करुन दीड लाख रुपये किमतीची 32 एन पी बोर पिस्टल (32 N P Bore Pistol) चोरुन नेली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Theft of a pistol from a Skoda car, an incident in Nigdi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates News | मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस