Pune Pimpri Chinchwad Crime | कोणतीही माहिती शेअर न करता बँक खात्यातून अडीच लाख रुपये गायब, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | केवायसी अपडेट (KYC Update) करण्याच्या बहाण्याने अथवा लाईट बिल (Light Bill) भरले नसल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेऊन परस्पर पैसे ट्रान्सफर (Money Transfer) केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये कोणतीही माहिती शेअर केली नसताना एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 59 हजार 850 रुपये काही बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.

याबाबत शरद भीमराव पवार Sharad Bhimrao Pawar (वय-49 रा. पिंपळे गुरव) यांनी
सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एच.डी.एफ.सी बँक
खाते धारक व इतरंविरोधात आयपीसी 420 सह माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद पवार यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra)
खात्यातून कोणतीही माहिती न देता 2 लाख 59 हजार 850 रुपये इतर बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले.
फिर्यादी यांनी बँक खात्याबाबतची माहिती कोणालाही शेअर केली नाही. तसेच त्यांना कुठलाही ओटीपी,
मेसेज देखील आलेला नाही. असे असता फिर्यादी यांच्या बँक खात्यातून HDFC बँकेच्या 50100570680340
या खाते क्रमांकावर व इतर खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे (Police Inspector Sunil Tonpe) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांचा डोंबाऱ्याचा खेळ;’ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर घणाघात

Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आमदाराने राणे समर्थकाला दिलेला शब्द पाळला; सांगितल्याप्रमाणे नितीन पाटील नरीमन पॉईंटवर आले अन्…

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती