Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करुन पतीला दिली जीवे मारण्याची धमकी, देहूरोडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कब्रस्तानचे गेट उघडे ठेवल्याच्या कारणावरुन दोघांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण (Beating) केली. यावेळी दोघांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना देहूरोड येथे घडली. ही घटना सोमवारी (दि.6) दुपारी अडीचच्या सुमारास ईदगाह मस्जिद कब्रस्तान (Eidgah Mosque Cemetery) येथे घडली.

याबाबत 28 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehurod Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजीज शेख Aziz Sheikh (रा. देहूरोड बाजार), जलील शेख Jalil Sheikh (रा. जामा मस्जिद, देहुरोड) यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कब्रस्तानमध्ये सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना जाता यावे यासाठी कब्रस्तानचे गेट उघडे ठेवले होते. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घातला.
तसेच फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादी या पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील धक्काबुक्की करुन
मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. तसेच फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी
(Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime | Woman molested and threatened to kill husband, incident in Dehurod

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मला त्यांना एवढंच सांगायचंय…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune Pimpri Chinchwad Crime | प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दिघीतील घटना; दोन सख्ख्या भावांना अटक