Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | जिल्ह्यातील देवगड येथील समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाल्याची माहिती शनिवारी सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान, बुडालेले 5 जण हे पुण्यातील एका खासगी सैनिकी अकादमीमधील मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुडालेल्यांमध्ये 4 मुलींचा तर एका मुलाचा समावेश आहे. (Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News)

शनिवारी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड परिसरातील एका खासगी सैनिकी अकादमीतील सुमारे 35 जणांची ट्रीप (सहल) देवगडला गेली होती. आंघोळीसाठी ते 5 जण समुद्रात गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे. (Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News)

मृतांमध्ये अंकिता गालटे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे आणि पायल बनसोडे यांचा समावेश आहे तर राम डिचोलकर हा बेपत्ता आहे. दरम्यान, शोधकार्य युध्दपातळीवर सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरात घुसून तलवारीने वार, आकुर्डी परिसरातील घटना; दोघांना अटक

Lingayat Community News | होय, आम्ही बसव तत्व स्वीकारलयं ! लिंगायत युवा पिढीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल

Talwade Fire Case | ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा, एकाला अटक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त