Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा

पुणे / तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police | तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) शिरगाव पोलीस चौकीत (Shirgaon Police Chowki) कार्यरत असणारे पोलीस नाईक दिलीप बोरकर (Police Naik Dilip Borkar) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. आज (रविवार) साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने देहूरोड येथील पवना हॉस्पिटलमध्ये (Pavana Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Pune Pimpri Chinchwad Police)

 

दिलीप बोरकर हे शिरगाव पोलीस चौकशी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत होते (Pune Crime).
दिलीप बोरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील होते. अत्यंत साध्या स्वभावाचे आणि मितभाषी असल्याचे त्यांच्या 2007 च्या बॅचचे मित्र घाडगे यांनी पोलीसनामा सोबत बोलताना सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्पीटलमध्य धाव घेतली (Pune Police). बोरकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Police)

 

शिरगाव पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ (Police Inspector Vanita Dhumal) यांनी सांगितले की,
दिलीप बोरकर हे 2007 च्या बॅचचे आहेत. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) आहेत.
यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Police | Police Naik Dilip Borkar of Shirgaon Police Chowki died of a heart attack at 36

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Vicky Kaushal Instagram Post | विक्की कौशलच्या ‘मदर्स डे’ पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, पोस्ट पाहून नेटकरी झाले भावूक..

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

 

Urfi Javed Crush Name | ‘या’ अभिनेत्यानं चोरलं उर्फी जावेदचं हृदय, दुप्पट वयाच्या कलाकाराचं नाव घेत ती म्हणाली – ‘मला तो खूप आवडतो..’