Lockdown : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 13 जुलैपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आज प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच दोन्ही पोलिस आयुक्तालयातील हद्दीत येणारे गाव आणि कॅन्टोमेंट परिसरात तब्बल 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार (दि.13) ते 23 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान, 19 जुलैनंतर परिस्थितीचा आढावा घेवुन त्यानंतर इतर कोणत्या गोष्टींना सुरू करण्याची परवानगी द्यायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पुणे विभागाचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्य सरकारनं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच पार्श्वभुमवीर हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, दूध, औषधे, हॉस्पीटल या एवढयाचे गोष्टी लॉकडाऊन काळात सुरूराहणार आहेत. विभागीय आयुक्त दीप म्हैसेकर, पुणे महानगरपालिकचे आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकारांना लॉकडाऊन बाबत सविस्तर माहिती दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने आणि कंपन्यांबाबत निर्णय नंतर जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहरालगतच्या तब्बल 22 गावांमध्ये यापुर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, नागरिकांनी लॉकडाऊनचे कटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.