Pune Pimpri Crime | देहूगाव परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणीची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime |  देहूगाव (Dehugaon) ते तळवडे रोड (Talwade Road) येथील अभिरुची लॉजमध्ये (Abhiruchi Lodge) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका 22 वर्षाच्या तरुणीची सुटका करण्यात आली असून तिघांवर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.8) अभिरुची लॉज येथे (Pune Pimpri Crime) करण्यात आली.

 

याप्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 370 (3) 34, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कायद्यांतर्गत राशीद हापीज बेग Rashid Happies Beg (वय 23 रा. देहुगाव), लॉजचे मालक वसंत शेट्टी Vasant Shetty (रा. चिखली) राणी काळे Rani Kale  (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून राशीद बेग याला अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका 22 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायाकरिता तयार केले.
तिला पैशाचे आमिष (Lure of Money) दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले.
तिला वेश्या व्यवसायात आणून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिविका भागवत होते.
कारवाईमध्ये 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 22 year old girl released after Prostitution racket exposed in Dehugaon area pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा