Pune Pimpri Crime | अश्लील बोलून 13 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; भोसरीमधील घटना

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) भोसरी येथे सोमवारी (दि.21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे.

 

याप्रकरणी आदेश वाघमारे (वय-18 रा. भोसरी), वैभव (अंदाजे वय -17 पूर्ण नाव पत्ता माहित नाही), वैभव साखरे (वय-17 रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 354, 354 (अ), 509, 323, 504, 34, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-35) भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी यांची 13 वर्षाची मुलगी घरामध्ये असताना आरोपी वैभव घराजवळ येऊन मुलीला अश्लील भाषेत बोलला.
तसेच मागील तीन महिन्यांपासून आदेश आणि वैभव हे दोघे तिची छेड काढत अश्लील हातवारे करत होते.
हा प्रकार वारंवार घडत असल्याने फिर्यादी यांचे पती याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी आदेश याने त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करुन
जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A 13-year-old girl was molested by speaking obscenities, her father was brutally beaten up for asking her questions; Incident in Bhosari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Pune News | विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी मुस्लिम समुदाय करणार विचारमंथन

Sania Mirza-Varun Dhawan | वरूण धवनने सांगितला सानिया मिर्झाशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा