Pune Pimpri Crime |  लग्नाचे आमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime |  महिलेसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून बलात्कार (Rape In Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रवीण भीमराव पाटील (Praveen Bhimrao Patil) याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) अटक केली आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर  2018 ते 2022 या कालावधीत आरटीओ रोड मोशी (RTO Road Moshi) आणि चाकण येथील एका (Pune Pimpri Crime)  हॉटेलवर घडला. (Crime Against Woman)

 

याबाबत 40 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण पाटील (वय – 35 रा. वल्लभनगर, पिंपरी ) याच्यावर IPC  376, 354 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत ओळख केली. त्यानंतर आरटीओ रोड मोशी येथे आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्ती करुन अश्लील कृत्य केलं. त्यानंतर पीडित महिलेसोबत जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीने महिलेच्या घरी आणि चाकण येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापीत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम (PSI Pournima Kadam) करीत आहेत.

 

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A 40 year old woman was raped on the pretext of marriage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा