Pune Pimpri Crime | देहूरोड येथील आरटीआय कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | हॉटेल व्यावसायिकाकडे महिना तीन हजार रुपये हप्ता मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या इतर साथीदारांवर देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) देहूरोड येथील एका उपहारगृहात सोमवारी (दि.28 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

 

याबाबत प्रमोद अरुण अवघडे (वय – 35, रा. शितळानगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन, अॅडम व त्यांच्या इतर चार जणांवर आयपीसी 383, 384, 387, 34, 120 (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे देहूरोड येथे उपहारगृह आहे.
28 नोव्हेंबर रोजी श्रीजीत रमेशन, अॅडम व त्यांचे इतर चार साथीदार फिर्यादी यांच्या उपहारगृहात आले.
आरोपींनी त्यांच्यासोबत आणलेली दारूची बाटली टेबलावर ठेवली असता उपहारगृहाच्या आचाऱ्याने या ठिकाणी दारू पिण्यास मनाई असल्याचे सांगितले.
त्यानंतर आरोपींनी टेबलावर ठेवलेल्या दारूच्या बाटलीचा फोटो काढून महिना तीन हजार रुपये हप्ता मागितला.
हप्ता दिला नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर श्रीजीत रमेशन यांनी फोटो व्हायरल करून फिर्यादी यांची समाजातील प्रतिष्ठा मलिन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A case of extortion has been filed against an RTI worker in Dehurod

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर