Pune Pimpri Crime | जमीन खरेदी प्रकरणात बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | चेक बाऊन्स (Cheque Bounce) झाल्याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रा. लि.चे (Sairung Developers & Promoters Pvt. Ltd.) मालक के.आर. मलिक (K.R. Malik) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद बिन शाहरुख Mohammad Bin Shah Rukh (रा. भारत पेट्रोल पंपासमोर, हिंजवडी फेज-2) यांच्यावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 13 एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत नेरे दत्तवाडी, हिंजवडी येथे घडला.

याबाबत शांताराम दत्तात्रय कुदळे Shantaram Dattatraya Kudale (वय-61 रा. गणेश नगर, नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) रविवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी के.आर. मलिक आणि त्यांचा मुलगा मोहम्मद बीन शाहरुख यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुदळे यांची नेरे दत्तवाडी (Nere Dattawadi) येथे असलेली 1 हेक्टर
20 आर ही जमीन साईरंग डेव्हलपर्स चे मालक के. आर. मलिक व त्यांचा मुलागा मोहम्मद यांना विकली होती.
त्याबदल्यात फिर्यादी यांना 1 कोटी 60 लाख रुपये आरोपींनी दिले.
तर उर्वरित 3 कोटी 10 लाख रुपयांचे चेक फिर्यादी यांना दिले.
फिर्यादी यांनी चेक बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले.
आरोपींनी फिर्यादी यांची रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख (API Deshmukh) करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Crime | A case of fraud has been registered against the builder in the case of land purchase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, काँग्रेस नेत्यासमोर रिफायनरी विरोधकाची धमकी

Fitness Tips | नेहमी रहायचे असेल फिट तर अवलंबा ‘या’ 5 सोप्या टिप्स, काही दिवसात दिसेल फरक