Pune Pimpri Crime | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याकडून टॉमीने मारहाण

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | हॉटेल समोरील रस्त्यावर सुरु असणारी भांडणं (Quarrel) सोडवणं एका हॉटेल व्यावसायिकाला (Hotelier) महागात पडलं आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना चार जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला टॉमीने बेदम मारहाण (Beaten by Tommy) करत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder) केला. हा प्रकार चाकण येथे शनिवारी (दि.27) रात्री सव्वा अकराच्या सुमारास चक्रेश्वर रोडवर असणाऱ्या मैफिल हॉटेलच्या (Pune Pimpri Crime) समोर घडला.

 

याप्रकरणी मारुती रमेश थिगळे, विशाल लक्ष्मण चौधरी, योगेश काशीनाथ थिगळे (रा.खेड), माहि रुपेश शिंदे (रा. कांची इन्कलेव्ह सोसायटी, चाकण) यांच्यावर IPC 307, 326,324, 504, 506,34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत महारुद्र शिवबसप्पा शिरगावी Maharudra Shivbasappa Shirgavi (वय – 38 रा. चक्रेश्वर रोड, चाकण मुळ रा. हुक्केरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या हॉटेलसमोर हातात दारुच्या बाटल्या घेऊन भांडण करत होते.
यावेळी तेथून जात असताना फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
तर मारुती थिगळे याने फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात काचेची बाटली मारुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ईको गाडीतील लोखंडी टॉमीने फिर्यादी यांच्या हातावर, पायावर, तोंडावर व डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे (PSI Bamane) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | A hotelier who intervened to resolve the dispute was beaten up by the gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा