×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | पिंपरीत ज्येष्ठ नागरिकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Pune Pimpri Crime | पिंपरीत ज्येष्ठ नागरिकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार पिंपरी येथील नेहरुनगर (Nehru Nagar) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) शनिवारी (दि.27) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडला आहे.

 

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अतुल मतिलाल पंडुरे Atul Matilal Pandure (वय-52 रा. उद्यमनगर, पिंपरी) याच्यावर आयपीसी 354, 323, 504 सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (Protection of Children from Sexual Offenses Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व त्यांच्या बहिणीची मुलगी या दोघी अंडी आणण्यासाठी दुकानात जात होत्या.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला पाचशे रुपये देऊ करत तिचा हात पकडून गैरवर्तन केले.
याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ, मुलगा गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण (Beating) केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | A minor girl was molested by a senior citizen in Pimpri

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Must Read
Related News