Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) रिक्षा चालकाने एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) रिक्षा चालकाला वाकड पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 1 डिसेबंर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपीच्या थेरगाव येथील घरी घडला.

याबाबत पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि.12) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद
दिली आहे. पोलिसांनी विकास सतिश गायकवाड Vikas Satish Gaikwad (वय-32 रा. थेरगाव) याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 376 (3) लैंगिक अपराधापासुन बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात.
आरोपी रिक्षा चालक असून त्याने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दखवून
तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून मुलगी आठ महिन्याची गरोदर राहिल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप (PSI Jagtap) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A minor girl was sexually assaulted by a rickshaw driver, an incident in Wakad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणे शहराला वर्षभर पुरणाऱ्या पाण्याचा मुठा नदीत विसर्ग

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली