Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलीला उचलुन नेण्याची धमकी देत केला विनयभंग, भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलीचा शाळेपर्य़ंत पाठलाग करत तिला उचलून नेण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना भोसरी मध्ये घडली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 2020 ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथील शाळेत घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी 25 वर्षाच्या आरोपीविरुद्ध आयपीसी 354 (ड), 506 सह पॉक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या नणदेचा मुलगा आहे.
आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फोन केले.
तसेच मुलगी शिकत असलेल्या शाळेपर्यंत तिचा पाठलाग केला.
शनिवारी (दि.19) आरोपीने तिचा शाळेपर्यंत पाठलाग करुन तिला आडवले.
तुला माझ्या सोबत बोलायचे नाही तर ठीक आहे. मी कधीही तुला उचलुन घेऊन जाईन, तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देऊन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A minor girl was threatened to be molestation, an incident in Bhosari area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Mumbai Crime | राजघराण्याचा वारस असल्याचे सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक; गोरेगावातील टिक टॉक ‘हिरो’ला अटक