Pune Pimpri Crime | बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, पिंपरी मधील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमधील एका बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (CEO) महिला शिपाई सोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) बँक अधिकाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दीड महिन्यापूर्वीपासून मंगळवारी (दि.13) सकाळी 11 च्या दरम्यान बँकेच्या पिंपरी शाखेत घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आयपीसी 354 (अ), 354 (ड), 506, 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामाला असलेल्या बँकेत आरोपी हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
दीड महिन्यापूर्वी आरोपीने फिर्यादी यांना चहा आणण्यास सांगून टेबल खाली सफाई नीट झाली नसल्याचे सांगितले.
फिर्यादी या टेबल जवळ पाहण्यासाठी गेल्या.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
या प्रकाराबाबत कुठे वाच्चता केली तर खोटे गुन्हे दाखल करुन नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी
दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A shocking incident in Pimpri where a female employee was abused by a bank CEO

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | टिंडर अ‍ॅपवर झाली ओळख, बलात्कार करुन उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News | शास्त्रीय संगीत प्रसार आणि प्रचारासाठी संगीता कुलकर्णी तर युवा पुरस्कार रुपाली काळे यांना प्रदान