Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा सुपारी देऊन काढला काटा

पुणे / तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे 9 ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास महिलेचा खून झाला होता. या खुनाचा (Murder In Pimpri) उलगडा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 (Pimpri Chinchwad Crime Branch Unit 5) ने केला आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) हा खून झाला आहे. महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने आरोपीने खूनाची सुपारी दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात (Pune Pimpri Crime) चार जणांना अटक (Arrest) केली असून तळेगाव पोलिसांनी (Talegaon Police Station) एका आरोपीला तर गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे.

 

बजरंग मुरली तापडे (वय-45 रा. तळेगाव दाभाडे मुळ रा. बनसारोळा, जि. बीड), पांडुरुंग उर्फ सागर बन्सी हारके (वय-35 रा. आदर्श नगर, मोशी, मुळ रा. किल्ले धारुर, जि.बीड), सचिन प्रभाकर थिगळे (वय-30 रा. चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा), सदानंद रामदास तुपक (वय-26 रा. मोटेखेड, ता. चिखली, ता. बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या महिलेचे आरोपी बजरंग तापडे याच्यासोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. या प्रेमसंबंधातून तिने बजरंग याच्याकडे लग्नाचा (Marriage) तगादा लावला होता. परंतु तो आधीच विवाहित होता आणि त्याला तीन मोठी मुले आहेत. त्यामुळे त्याने महिलेच्या हत्येची सात लाख रुपयांची सुपारी आरोपी पांडुरंग हारके याला देत चार लाख रुपये अॅडव्हान्स दिले. आरोपी पांडुरंग हाके याने आरोपी सचिन थिगळे याला एक लाख रुपये रोख देत महिलेचा फोटो दाखवून तिचा जाण्यायेण्याचा मार्ग दाखवला.

आरोपी सचिन आणि सदानंद यांनी महिलेची घराची रेकी केली. 9 ऑगस्टला सकाळी 8 वाजता महिला स्कुटी वरून जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीवरुन येऊन इंद्रपुरी कॉलनी कडे जाणाऱ्या रोडवर भंडारी व्हिलाचे बाजूच्या रस्त्यावर महिलेची गाडी आडवली. तिला खाली उतरवून तिचे केस पकडून धारदार चाकूने गळा चिरुन खून करुन घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांनी तळेगाव दाभाडे ते चिंबळी असा 60 ते 65 किलोमीटर परिसरात माग काढला. आरोपी राहत असलेल्या ठिकाणी आजुबाजुला चौकशी करुन तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole ),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे (Senior Police Inspector Manoj Khandale),
पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी (PSI Rahul Koli), पोलीस अंमलदार किरनाळे,
बनसुडे, बहीरट, ठाकरे, राठोड, मालुसरे, खेडकर, भोसले, गाडेकर,
ब्रह्मांदे, गट्टे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुगले यांनी केला.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A thorn is removed by giving a betel nut to a
lover who is trying to get married out of a love affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा