×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | कामाचे पैसे मागितल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण;...

Pune Pimpri Crime | कामाचे पैसे मागितल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण; दोन भावांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन भावांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेचे कपडे फाडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) पिंपरी गावात गुरुवारी (दि.1) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

 

याबाबत 46 वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विनोद किसनचंद मतानी (वय 42), सुनील किसनचंद मतानी (वय 45, दोघे रा. पिंपरी गाव, पिंपरी) यांच्यावर आयपीसी 354, 294, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कामाचे पैसे घेण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता आरोपींच्या घरी गेल्या होत्या.
फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपी विनोद मतानी व
सुनील मतानी यांनी फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत शिवीगाळ केली.
तसेच विनोद मतानी फिर्यादींच्या अंगावर धावून गेला व त्याने फिर्यादी यांच्या अंगावर
हात टाकत त्यांचे कपडे फाडत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा सर्व प्रकार फिर्यादी यांच्या नणंद यांच्यासमोर झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. सूर्यवंशी करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A woman was beaten by obscene abuse for asking for money for work; FIR against two brothers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर

Must Read
Related News