Pune Pimpri Crime | मित्र तुरुंगात गेल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | तुझ्या बहिणीमुळे माझा मित्र जेलमध्ये गेला असे म्हणत सहा जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास लांडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नागेश जोगदंड, तम्या जोगदंड, सुरज हानवते, महेश हानवते, वैभव जोगदंड, अविनाश जाधव (सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयपीसी 143,147, 149, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी 17 वर्षाच्या मुलाने रविवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश जोगदंड याने फिर्यादीच्या घरी येऊन आजीला शिवीगाळ केली.
तसेच तुझ्या बहिणीमुळे माझा मित्र शकील जेलमध्ये आहे व माझी स्प्लेंडर गाडी पोलीस ठाण्यात जमा आहे
असे म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या भावाला देखील मारहाण केली. या घटनेत फिर्यादी यांच्या नाकाला व तोंडावर दुखापत झाली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A youth was brutally beaten up by a gang out of anger that a friend had gone to jail, an incident in Bhosari area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Pune NCP | रामदेव बाबांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत