Pune Pimpri Crime | ‘मोफा’तील फरार बिल्डर प्रतीक अगरवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक, 2 वर्षे होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मुळशी तालुक्यातील नेरेगाव येथे द व्हिलेज रेसीडेन्सी येथे 35 जणांना घर देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्याकडून घरांची किंमत वसूल करुन फरार झालेला बांधकाम व्यावसायिक (Builder) प्रतीक अगरवाल (Pratik Agarwal) याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा विरोधी पथकाने नागपूर येथून अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Crime)

आरोपी प्रतीक ओमप्रकाश अगरवाल (रा. बाणेर, पुणे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) मोफा अंतर्गत (MOFA Act) गुन्हा (FIR) दाखल आहे. याबाबत मनमिंदरसिंग तिर्थसिंग आनंद Manmindersingh Tirthasingh Anand (वय – 55, रा. औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अगरवालने अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर तो पोलिसांच्या स्वाधीन न होता गेली दोन वर्षे फरार होता. अखेर त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Pimpri Crime) नागपूर येथून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

मुळशी तालुक्यातील द व्हिलेज रेसीडेन्सी, नेरेगाव, (The Village Residency, Neregaon) या
ठिकाणी बांधकाम व्यावसायिक प्रतिक अगरवाल, किरण कुंभारकर Kiran Kumbharkar (रा. हिंजवडी),
विनय बोरीकर Vinay Borikar (रा. हिंजवडी) यांनी फिर्यादी मनमिंदरसिंग आनंद आणि इतर 34
सदनिका धारकांना मार्च 2018 रोजी खरेदीखत देऊन 4 कोटी 14 लाख 27 हजार 491 रुपये उकळले.
त्यानंतर त्यांची फसवणूक (Fraud Case) करुन त्यांना सदनिकांचा ताबा न देता फरार झाले.
याबाबत तिघांच्या विरोधात हिंडवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) 406, 420, 34 आणि मोफा कायद्यांतर्गत (MOFA Act) कलम 03 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Absconding builder Prateek Agarwal from ‘Mofa’ arrested by Pimpri Chinchwad police, absconding for 2 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

Shraddha Walkar Murder Case | ‘या’ अँपवर झाली होती श्रद्धा आणि आफताबची ओळख; आता म्हणाले घटनेबद्दल ऐकून धक्का बसला

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोडली सगळी लाज, कॅमेऱ्यात कैद झाले ‘या’ अवस्थेतील फोटो