Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मला तू कॉलजमध्ये होती तेव्हापासून आवडतेस असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन (Abuse) केले. हा प्रकार पीडित महिलेच्या किराणा दुकानात सोमवारी (दि.9) दुपारी बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

मोहन गंगाधर साळवे Mohan Gangadhar Salve (वय-24 रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपी साळवे याच्यावर आयपीसी 354, 354 (ड) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे यशवंत नगर (Yashwant Nagar) परिसरात किराणा मालाचे
दुकान आहे. सोमवारी दुपारी फिर्य़ादी या दुकानात एकट्या असताना आरोपी मोहन साळवे हा दुकानात आला.
त्याने मला तू कॉलेजमध्ये असल्यापासून आवडतेस म्हणत फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन केले.
फिर्यादी या घाबरून तेथून पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Abuse of woman saying I love you since college, accused Gajaad; Incident at Talegaon Dabhade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त