Pune Pimpri Crime | हृदयद्रावक ! शाळेत निघालेल्या माय-लेकाच्या दुचाकीचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | आईसोबत दुचकीवरुन शाळेत जात असताना एका चारचाकीची धडक दुचाकीला बसली. यामध्ये शाळकरी मुलगा मालवाहू ट्रकच्या खाली सापडला. या भीषण अपघातात मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. हा अपघात (Pune Pimpri Crime) आज (गुरुवार) सकाळी जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नरला झाला.

 

अथर्व रवींद्र आळणे (वय-11) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. आज सकाळी हर्षदा आळणे या अथर्वला घेऊन दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. शाहूनगरच्या कॉर्नरला स्कुटीला चारचाकी वाहनाची धडक बसली. त्यामुळे स्कुटीवर असलेला अथर्व मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडला. तर हर्षदा दुसऱ्या बाजूला पडल्या. (Pune Pimpri Crime)

 

या अपघातात हर्षदा किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर अथर्वला ट्रकने काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून हर्षदा यांनी हंबरडा फोडला.
अथर्व असा अचानक आपल्याला सोडून जाईल याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती.
या अपघाताची नोंद भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक आणि चारचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | an 11 year old school boy died in an accident in pimpri chichwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?