Pune Pimpri Crime | वीजखंडित करण्याच्या बहाण्याने दीड लाखांचा गंडा, पिंपरी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | इलेक्ट्रिसिटी बोर्डातून बोलत असल्याचे सांगून जुने लाईट बील अपडेट करण्याचा बहाणा करुन क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) सोमवारी (दि.12) रात्री पावणे नऊच्या सुमारास पिंपरी येथे घडला आहे.

 

याबाबत दीपक जगुमल तराणी Deepak Jagumal Tarani (वय-47 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 6200351232 व 9382831269 या क्रमांकाच्या धारकांवर आयपीसी 420, आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ma electricity power will be disconnected 10.30 pm because your bill not updated contact call electricity असा मेसेज त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आला. हा मेसेज 9382831269 या क्रमांकावरुन पाठवण्यात आला होता. तसेच फिर्यादी यांना याच क्रमांकावरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने इलेक्ट्रिसिटी बोर्डातून (Electricity Board) बोलत असल्याचे सांगून जुने लाईट बिल अपडेट करायचे असल्याचे सांगितले.

आरोपीने फिर्यादी यांचा क्रेडिट कार्ड (Credit Card) नंबर, एक्सपायरी डेट,
सीव्हीव्ही नंबर मिळवून त्यांना प्लेस्टोअर अॅपवरुन क्विक सपोर्ट अॅप (Quick Support App)
डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांची 1 लाख 69 हजार 662 रुपयांची फसवणूक (Fraud) केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्य़ादी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | An incident in Pimpri, cheating of one and a half lakhs on the pretext of power cut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार