Pune Pimpri Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, चाकणमधील शिवसेना भवन समोरील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 12 ते 13 जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक (Pune Pimpri Crime) घटना सोमवारी (दि.21) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान चाकण मधील शिवसेना भवनासमोर घडली. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना अटक केली आहे.

 

मोन्या उर्फ मोनेश संजय घोगरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोनेश चा मित्र अमोल विश्वनाथ लाटूकर (वय-24 रा. एकता नगर, ता. खेड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल हा या घटनेत जखमी झाला आहे. पोलिसांनी शुभम मस्के, चेतन मस्के, चंदर उर्फ चंद्रकांत कुऱ्हाडे, रोहित कुऱ्हाडे, अर्जुन कुऱ्हाडे, हिऱ्या उर्फ आकाश चौधरी, किशोर धिवर, प्रणव जाधव, सोनु किसन डिंबळे (वय-18 रा. खंडोबामाळ, चाकण), अर्जुन कुऱ्हाडे याचा मोठा भाऊ (नाव माहित नाही) व इतर तीन ते चार जणांवर आयपीसी 302, 307, 324, 341, 141, 143, 144, 147, 148, 149, 506, 120 (ब), आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चेतन मस्के आणि चंदर उर्फ चंद्रकांत कुऱ्हाडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल आणि मयत मोनेश हे दोघे सोमवारी रात्री चाकण येथील शिवसेना भवन समोरील रस्त्यावरुन जात होते.
त्यावेळी तीन दुचाकीवरुन आरोपी त्या ठिकाणी आले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी दोघांचा रस्ता आडवला.
आरोपी शुभम म्हस्के याने तुम्हाला ‘लय माज आला आहे काय आज तुमची विकेटच टाकतो’ असे
म्हणून साथीदारांना त्या दोघांना पकडण्यास सांगितले.
त्यानंतर शुभम, रोहित, आकाश आणि प्रणव यांनी कोयत्याने मोनेश याच्या डोक्यावर, पोटावर, हातावर सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन मोनेश याचा जागीच मृत्यू झाला.
तर चंदर, किशोर आणि अर्जुन कुऱ्हाडेच्या मोठ्या भावाने अमोल लाटूकर याच्यावर कोयत्याने वार करुन
गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जऱ्हाड करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Attempt To Kill Murder Chakan Shivsena Bhavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune City Street Vendors Committee Election | पुण्यातील नगर पथविक्रेता समिती निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | शिंदे सरकारला लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पडतील

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या