Pune Pimpri Crime | दारु धंद्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दारुचा व्यवसाय (Liquor Business) बंद करण्याकरिता पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांनी एकाला लोखंडी रॉड बेदम मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) रावेत पोलीस चौकीत (Ravet Police Chowki) चार जणांविरुद्ध IPC 307, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Pune Pimpri Crime) केली आहे.

याप्रकरणी विशाल आप्पा चंदू कदम Vishal Appa Chandu Kadam (वय-31 रा. रमाबाई नगर रावेत) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंगाधर देवेंद्र नाटेकर Gangadhar Devendra Natekar (वय-22), दिपक वाल्मिक घनगाव Deepak Valmik Ghangaon (वय-23), मोनेश देवेंद्र नाटेकर (Monesh Devendra Natekar), रोहन वाल्मिक घनगाव (Rohan Valmik Ghangaon) (चौघे रा. रमाबाईनगर, रावेत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन गंगाधर नाटेकर आणि दिपक घनगाव यांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी गंगाधर नाटेकर याचा दारुचा धंदा पुर्णपणे बंद करण्यासाठी पोलीस चौकीत तक्रार अर्ज दिला आहे. शनिवारी रात्री फिर्यादी हे घराच्या शेडच्या बाजूला थांबले होते. आरोपी मोनेश नाटेकर हा त्यांच्याजवळ आला. त्याने बोलायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांना बाजूला घेऊन गेला. त्याठिकाणी गंगाधर नाटेकर याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून हातातील फरशीचा तुकडा फिर्यादी यांच्या डोक्यात घातला. तर मोनेश याने लोखंडी गजाने डोक्यात, हातावर, पायावर मारहाण केली. तसेच दिपक घनघाव आणि रोहन घनघाव याने फिर्यादी यांच्या छातीत दगड मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव (API Vishal Jadhav) करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | Attempt to kill out of anger after filing a complaint with the police against the liquor business pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर