Pune Pimpri Crime | पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पूर्वी झालेल्या भांडणाच्या (Quarrel) रागातून तीन जणांनी दोन विद्यार्थ्यांवर धारदार हत्याराने सपासप वार (Attack) केल्याची घटना हिंजवडी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तीन जणांवर आयपीसी 307, 341, 506, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा अंतर्गत (Criminal Law Amendment Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) शुक्रवारी (दि.2) रात्री साडे अकराच्या सुमारास नेरे दत्तवाडी रोडवरील (Nere Dattawadi Road) तुकाई विद्यालयाजवळ घडली.

 

शिवराज मारुती शेडगे Shivraj Maruti Shedge (वय-20 रा. कासारसाई), चैतन्य उर्फ संदिप परशुराम माणके Chaitanya aka Sandeep Parashuram Manke (वय-20 रा. कासारसाई, ता. मावळ) आणि गाडी चालवणाऱ्या अनोळकी मुलावर गुन्हा दाखल करुन शिवराज आणि चैतन्य यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जखमी आकाश अरुण खानेकर Akash Arun Khanekar (वय-18 रा. नेरे दत्तवाडी, पुणे मुळ रा. खांबोली, ता. मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) शनिवारी (दि.3) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते.
फिर्य़ादी व त्यांचा मित्र वरुण गारडी (Varun Gardi) हे दुचाकीवरुन जात होते.
त्यावेळी पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी फिर्य़ादी यांच्या गाडी आडवली.
आरोपी शिवराज आणि चैतन्य यांनी जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने फिर्य़ादी यांच्यावर डोक्यात वार केले.
यानंतर पुन्हा वार केले असता फिर्यादी यांनी ते वार हातावर झेलले. आरोपींनी फिर्यादी यांच्या मित्रावर देखील वार केले.
यावेळी फिर्य़ादी व त्यांच्या मित्राने आरडाओरडा केला असता फिर्यादी यांचे ओळखीचे योगेश जाधव (Yogesh Jadhav) त्याठिकाणी येत असल्याचे पाहून आरोपी गाडीवर बसून दत्तवाडीच्या दिशेने निघून गेले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाळ (API Khatal) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Attempt To Murder Case Hinjewadi Police Station Incident in Nere Dattawadi Raod Pune Pimpri Crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘हम जेल काट के आय है’ म्हणत गुंडांनी माजविली दहशत ! शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये दोन गटात राडा

 

Pune Crime | मोबाईलचा गैरवापर करुन दुकानदाराने घातला व्यावसायिकाला 12 लाखांना गंडा; उत्तमनगर पोलीस ठाण्यात FIR

 

Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?