Pune Pimpri Crime | इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याने टोळक्याकडून मारहाण; तळेगाव दाभाडेमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली (Pune Pimpri Crime) आहे. हा प्रकार शनिवारी (दि.4) रात्री साडेसातच्या सुमारास तळेगाव येथील टेल्को कॉलनीत घडला आहे.

याबाबत 19 वर्षांच्या तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. विकास कनकुटे (वय 25, रा. रानवारा हॉटेलसमोर, कातवी, ता. मावळ), साहिल सोनवणे (वय 22, रा. वडगाव, ता. मावळ), नीलेश सोपान कनकुटे (वय 24, रा. कातवी गाव, तळेगाव एमआयडीसी) व इतर तीन जणांवर आयपीसी 143, 147, 149, 323, 452, 504, 506बी अन्वये गुन्हा दाखल केला असून, विकास व नीलेश कनकुटे यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या भावाने इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून आरोपी शनिवारी रात्री दुचाकीवरून घरी आले. ते जबरदस्तीने घरात घुसले.
त्यांनी भावाला शिवीगाळ करून हाताने बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोकतरे करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Beating by gang for posting status on Instagram; Incident in Talegaon Dabhade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

Shahaji Maharaj | कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार

Prakash Ambedkar | ‘तूर्तास काही घाई नाही…’ ! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चेची बातमी प्रकाश आंबेडकरांनी फेटाळली