Pune Pimpri Crime | मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या भावावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | जातिवाचक शिवीगाळ (Caste Abuse) केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.15) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत परस्पर विरोधी दोन गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एक मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके (Maval NCP MLA Sunil Shelke) यांचे बंधू सुधाकर शेळके (Sudhakar Shelke) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष (Janseva Vikas Samiti) किशोर भाऊ आवारे (Kishore Bhau Aware) यांच्या विरोधात दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, पहिल्या प्रकरणात वाहन चालक असलेल्या प्रविण सिद्धार्थ ओव्हाळ Pravin Siddharth Oval (वय-36 रा. वराळे, ता. मावळ) या वाहन चालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधाकर शेळके आणि मॉन्टी दाभाडे Monty Dabhade (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत (Scheduled Castes and Scheduled Tribes Act) गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे 10 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोरील सेवा रस्त्यावर (लिंब फाटा) सार्वजनिक ठिकाणी थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांना अपमानित करण्याच्या उद्देशाने आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. (Pune Pimpri Crime)

दुसऱ्या प्रकरणात संदिप संजय सदावर्ते Sandeep Sanjay Sadavarte (वय-34 रा. तळेगाव दाभाडे) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार किशोर आवारे, मिलिंद अच्युत Milind Achyut (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा
गुन्हा (Atrocities Act) दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारातील कॅन्टीनच्या बाजूला थांबले होते.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | case of atrocity has been registered against sudhakar shelke brother of maval ncp mla sunil shelke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे