Pune Pimpri Crime | फायरिंगच्या घटनेनंतर CP ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; चाकण, तळेगाव दाभाडे येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर पोलीस आयुक्तांकडून ‘मोक्का’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या (Firing) घटनेनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तांनी गुरुवारी (दि.8) एकाच दिवशी तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. चाकण येथील एक आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आजपर्यंत 18 गुन्ह्यांमध्ये 129 आरोपींवर मोक्का कारवाई (Pune Pimpri Crime) करण्यात आली आहे.

 

चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) हद्दीतील सत्यम उर्फ पप्पू दत्तात्रय कड (वय 22, रा. बापदेव वस्ती, कडाची वाडी, चाकण) याच्यासह इतर दोन जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी चाकण परिसरात खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत (Serious Injury), गर्दी हाणामारी, खंडणीसाठी अपहरण (Kidnapping), खंडणी मागणे (Extortion), शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे गंभीर गुन्हे केले आहे. या टोळीवर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे (Senior Police Inspector Vaibhav Shingare) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर (DCP Manchak Ipper) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde) यांच्याकडे सादर केला होता. कागदपत्रांची पडताळणी करून या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.. (Pune Pimpri Crime)

तळेगाव दाभाडे परिसरात दहशत माजवणाऱ्या कुणाल उर्फ बाबा धीरज ठाकूर (वय 22, रा. गणपती चौक, तळेगाव दाभाडे) याच्यासह इतर 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill), बेकायदा हत्यार बाळगणे असे एकूण 7 गंभीर गुन्हे केले आहेत. बाबा ठाकूर टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे (Talegaon Dabhade Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (Senior Police Inspector Ganesh Jawadwad) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. कागदपत्रांची पडताळणी करून या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

 

तसेच तळेगाव येथील करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय 25, रा. रामटेकडी, हडपसर) याच्यासह त्याच्या एका साथीदारावर मोक्का कारवाई केली आहे.
आरोपींनी तळेगाव दाभाडे परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जीवघेणा हल्ला करणे,
दरोड्याची तयारी करणे, चोरी, दिवसा घरफोडी, रात्रीची घरफोडी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे केले आहेत.
त्यांच्यावर 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर मोक्का कारवाई करण्याच्या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,
पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 डॉ. काकासाहेब डोळे,
पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पद्माकर घनवट
(ACP Padmakar Ghanvat) यांच्या मार्गदर्शनाखाली पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (Senior Police Inspector Balkrishna Sawant),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण,
व्यंकट कारभारी, बर्डे, गुंजाळ, विकास तारू यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | CP in ‘action mode’ after firing incident; ‘Mokka’ by the Commissioner of Police on the gangs of criminals in Sarai in Chakan, Talegaon Dabhade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…