Pune Pimpri Crime | तडीपारीचा खर्च म्हणून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करत मागितली खंडणी

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | माझ्या तडीपारीमध्ये खर्च झालाय मला 10 लाख रुपये दे असे म्हणत एका हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करत खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार चाकण येथे घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर IPC 307, 385, 387, 324, 341, 323, 504, 506, 34 नुसार चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मंगळवारी (दि.30) रात्री साडेबारा ते एक दरम्यान चाकण येथील खंडोबामाळ येथे घडली.

 

किरण सुदाम गोतारणे Kiran Sudam Gotarane (वय-35), मयुर मेटे Mayur Mete (वय-30), नवनाथ शरद गोरे Navnath Sharad Gore (वय-32 सर्व रा. चाकण ता. खेड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन किरण गोतारणे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत असिफ युसुफ शेख Asif Yusuf Shaikh (वय-39 रा. चाकण) यांनी चाकण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक (Hotel Professional) असून मंगळवारी रात्री ते आणि त्यांचे साथिदार मंगेश तुकाराम शिंदे Mangesh Tukaram Shinde (वय-42) हे घरी जात होते.
त्यावेळी आरोपी तिथे आले व त्यांनी मंगेश यांना मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी मंगेश यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले.
त्यावेळी फिर्यादी हे भांडण सोडवत असताना आरोपी किरण गोणाते म्हणाला, माझा तडीपारीमध्ये लय खर्च झालाय,
तु मला 10 लाख रुपये द्यायचे त्यातील 1 लाख रुपये मला आताच पाहिजेत, असे म्हणत खंडणी मागितली.

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी आळी पाळीने लोखंडी रॉड, लाकडी फळी आणि हाताने माराहण केली.
तसेच नवनाथ गोरे याने फिर्यादी यांच्या गळ्याला रुमाल आवळुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड (API Rathod) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Extortion was demanded by beating up the hotelier as the expenses of Tadipari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP-MNS Alliance | ‘भाजप-मनसेला युती करण्याची गरज नाही, कारण…’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण

 

SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्‍यांनी जाणून घ्याव

 

Maharashtra Politics | शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी, श्रीकांत शिंदेंना मिळणार ‘ही’ जबाबदारी?