Pune Pimpri Crime | इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना प्रेमात पडला, एकतर्फी प्रेमातून पतीसमोर मिठी मारुन केला विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | एकतर्फी प्रेमातून पतीसमोर मैत्रिणीला मिठी मारुन विनयभंग केल्याची घटना भोसरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार (Pune Pimpri Crime) भोसरी येथे 12 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या दरम्यान घडला आहे.

याबाबत 27 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.23) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर शालिग्राम भांरबे (वय-29 रा. धनकवडी, कात्रज, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना एकमेकांचे मित्र
होते. आरोपी फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.
फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर आरोपीने फोन करुन त्रास दिला. तर मंगळवारी (दि.22) रात्री पावणे अकराच्या
सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला दोघांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून माझे खुप प्रेम आहे,
ती माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही असा मेसेज केला.

यानंतर सागर याने फिर्यादी त्यांचे पती आणि आई वडिलांना बोलावून घेतले. त्यावेळी त्याने पतीसमोर फिर्यादी
यांना मिठी मारुन मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. पती व आई वडिलांनी फिर्यादी यांना आरोपीच्या
ताब्यातून सोडवले. सागर याने पीडित महिलेच्या पतीला ‘तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पाहुन घेईन’
अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरंगे करीत आहेत.

Web Title :-Pune Pimpri Crime | Fell in love while studying engineering, molested by hugging in front of husband out of one-sided love

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

Bank Holiday In Maharashtra And Goa | डिसेंबरमध्ये 13 दिवस बँकांना सुट्टया, जाणून घ्या महाराष्ट्र आणि गोव्यात किती दिवस राहणार बँका बंद