Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन करून त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एप्रिल 2022 मध्ये खराबवाडी येथील चाकण-तळेगाव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागे घडला आहे.
याबाबत पीडित मुलाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी हे मामाकडे राहण्यास आले होते. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली. फिर्य़ादी आणि आरोपी फोनवर बोलत असताना आरोपी तरुणीने फिरायला जाऊ असे सांगत फिर्यादी यांना बोलावून घेतले. त्यानंतर ते दोघे चाकण तळेगाव मार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या (Indian Oil Petrol Pump) मागे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर गेले.
एका शेतात गप्पा मारत असताना तरुणीने अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन करत
शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | FIR against 20-year-old girl for forcing sexual
intercourse with minor; Shocking incident in Chakan area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोघांवर कुऱ्हाडीने वार; कोंढवा परिसरातील घटना
- Pune PMC News | यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिक प्लेटस, काटे, चमचे वापरावरील निर्बंध हटविले;
परंतू उत्पादनांना सीआयपीईटी आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र केले आवश्यक - Baramati News | बारामती-लोणंद रेल्वेमार्गासाठी सक्तीचे भूसंपादन?