Pune Pimpri Crime | पतीचा खून करुन केला गळफास घेतल्याचा बनाव, पत्नीवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पतीचा खून (Husband Murder) करुन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीवर वाकड पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अनिल उत्तमराव राठोड Anil Uttamrao Rathod (वय-35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) सोमवारी (दि.6) मध्यरात्री दोन वाजता ताथवडे (Tathawade) येथे घडला.
याप्रकरणी अनिल याची पत्नी उषा अनिल राठोड (Usha Anil Rathod) हिच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात आयपीसी 302 नुसार मंगळवारी (दि.7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अनिलचा लहान भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड Ravikumar Uttamrao Rathod (वय-32 रा. रामापुर तांडा, पो. बनवस, ता. पालम, जि. परभणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोठा भाऊ मृत अनिल राठोड आणि त्याची पत्नी उषा राठोड हे दोघे ताथवडे येथील लोंढे वस्तीत भाड्याच्या खोलीत राहत होते. घरगुती भांडणाच्या (Domestic Quarrels) कारणावरुन सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास उषा हिने अनिलच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. खून केल्यानंतर तिने अनिल यांनी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र तिचा हा बनाव जास्तवेळ टिकू शकला नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | FIR against wife for murder of husband and strangulation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Retirement Investment Planning | निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्यासाठी ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर
- Recurring Payments | बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! RBI कडून आवर्ती व्यवहारांच्या मर्यादेत वाढ
- Maharashtra MLC Elections 2022 | भाजपची करेक्ट खेळी ! रोहित पवारांना आव्हान देण्यासाठी ‘या’ नेत्याला उमेदवारी