×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | विजेचे बील थकल्याचे सांगत साडेनऊ लाखांची फसवणूक,...

Pune Pimpri Crime | विजेचे बील थकल्याचे सांगत साडेनऊ लाखांची फसवणूक, भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminal) लोकांना फसवण्याचे (Fraud) नवनवीन मार्गाचा अवलंब केला जात आहे. आता सायबर चोरट्यांनी वीज ग्राहकांना (Electricity Consumers) टार्गेट केले आहे. वीज वितरण विभागातून बोलत असल्याचे सांगून ते लोकांची बँक खाती (Bank Account) रिकामी करत आहेत. अशीच एक (Pune Pimpri Crime) घटना भोसरीमध्ये घडली आहे.

मी एम.एस.ई.बी हेड ऑफिस मधुन बोलत असल्याचे सांगून तुमचे या महिन्याचे लाईट बिल थकल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी मोबाईलवर लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी बँक खात्यातून तब्बल 9 लाख 51 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याबाबत नानासाहेब निवृत्ती जगताप Nanasaheb Nivritti Jagtap (वय-56 रा. नित्यानंत हॉल समोर, सिंहगड रोड, हिंगणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) दुपारी चार ते साडेपाच या दरम्यान घडला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध आयपीसी 419, 420 आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कासारवाडी येथील फोर्ब्स मार्शल कंपनीत
(Forbes Marshall Company) काम करतात. मंगळवारी ते कंपनीत काम करत असताना त्यांच्या
मोबाईल क्रमांकावर 8102635647 व 9426752941 या नंबरवरुन एका अनोळखी व्यक्तीने फोन केला.
‘मी एम.एस.ई.बी. हेड ऑफिस मधुन बोलत आहे’ असे सांगून तुमचे या महिन्याचे लाईट बिल (Light Bill) थकल्याचे त्याने सांगितले. तसेच ते अपडेट करावे लागेल असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगितले.
लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड झाले.
त्याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या आय.सी.आय.सी.आय. बँक (ICICI Bank ) खात्यातून 9 लाख 51 हजार
रुपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ
भोसरी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Fraud of 9.5 lakhs claiming that electricity bills have been exhausted, incident in Bhosari area

Must Read
Related News