Pune Pimpri Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, 2 पिस्टल, काडतुसे, कोयते जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरीगाव येथे असलेल्या एका वाईन शॉपवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई (Pune Pimpri Crime) शनिवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास ब्लॅक पर्ल कॅफे येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी पिस्टल, छऱ्याची बंदुक, काडतुसे आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 2 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

यश कैलास भोसले (वय-19 रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी), आकाश विनोद हराळे (वय-26, रा. बौद्धनगर, पिंपरी), निहाल मोहम्मद शेख (वय-25 रा. दत्तनगर, चिंचवड), अजय लोभाजी कांबळे (वय-20 रा. दत्तनगर, चिंचवड), महेश महादेव चंदनशिवे (वय-26 रा. घरकुल, चिखली), अनिकेत सचिन पवार (वय-21 रा. दर्जी गल्ली, खडकी), अविनाश राकेश पवार (वय-23 रा. दत्तनगर, चिंचवड), शुभम दिपक घरवाढवे (वय-19 रा. भाटनगर शेजारी, पिंपरी), बालाजी रमेश ओगले (वय-25 रा. अशोकनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 399, 402, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील रिगल वाईन शॉप येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असून ते ब्लॅक पर्ल कॅफेच्या टेरेसवर थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीच्या दोन देशी बनावटीच्या पिस्टल, 4 हजार रुपये किंमतीचे चार काडतुसे,
एक छऱ्याची बंदुक, 90 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल,
1 लाख 20 रुपये किमतीच्या चार दुचाकी असा एकूण 2 लाख 64 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुलढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डोंब करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Gang in preparation for robbery raided, 2 pistols, cartridges, coyote seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शेकोटीवरुन अल्पवयीन मुलांनी टपरी व्यावसायिकाचा पालघनने वार करुन केला खून; खडकीतील घटना

Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 पिस्टल 2 काडतुसे जप्त