Pune Pimpri Crime | ‘माझे लग्न तिच्याशी लावून द्या, नाहीतर मी…’, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शाळा (School), क्लासच्या (Class) ठिकाणी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन लग्नाची मागणी (Demand for Marriage) घालून आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी (Threat) देणाऱ्या रोडरोमियोवर (Road Romeo) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.16) पीडित मुलीच्या घरामध्ये रात्री 8.30 च्या (Pune Pimpri Crime) सुमारास घडला.
सुमित सुखदेव रागपसरे (वय – 18 रा. नेहरुनगर, पिंपरी) याच्यावर पोलिसांनी आयपीसी 354 (ड), 506 तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबात पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी (दि. 19) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी खराळवाडी येथील शाळेत शिकत असून ती नेहरुनगर येथे एका खासगी क्लासला जाते. आरोपी जून महिन्यापासून तिचा शाळा आणि क्लासच्या परिसरात पाठलाग करत होता. तिने आपल्यासोबत फोनवर बोलावे असा आग्रह आरोपीने केला होता. परंतु मुलीने त्याला नकार दिला. तरीदेखील त्याने मुलीचा पाठलाग करणं बंद केलं नाही.
16 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी सुमीत हा फिर्यादी यांच्या घरात आला.
त्यावेळी घरामध्ये फिर्यादी त्यांचे पती आणी मुलगी होती. आरोपीने ‘माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे.
ती मला आवडते. तुम्ही माझे लग्न तिच्याशी लावुन द्या नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करुन घेईन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निरीगिरी (PSI Nirigiri) करत आहेत.
Web Title : – Pune Pimpri Crime | Get me married to her or I FIR on Rodromeo for molesting minor girl
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update