Pune Pimpri Crime | स्पर्धा परीक्षा केंद्रासमोर तरुणीचा विनयभंग, भोसरीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे म्हणत तरुणीचा पाठलाग केला. तसेच भररस्त्यात ओढणी पकडून विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना भोसरी येथे रविवारी (दि.22) घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) गव्हाणे वस्ती येथील एका स्पर्धा परीक्षा केंद्रासमोरील सार्वजनिक रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मार्तंड भिमराव पवार Martand Bhimrao Pawar (वय-36 रा. भोसरी) याच्याविरुद्ध आयपीसी 354, 354 (ड) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा ऑगस्ट 2021 पासून वेळोवेळी पाठलाग केला.
माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे म्हणत फ्रेन्डशीप करण्याबाबत जबरदस्ती केली.
फिर्यादी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रविवारी फिर्यादी या एका स्पर्धा परिक्षा केंद्रासमोरील सार्वजनिक रोडवरून पायी जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांची ओढणी पकडून त्यांना जबरदस्तीने थांबवले.
त्यानंतर त्यांचा हात पकडून गैरवर्तन केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Girl molested in front of competitive examination center, incident in Bhosari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | मावस भावाकडून 15 वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; मावळमधील घटना

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज