Pune Pimpri Crime | पिंपरीत पिस्तूलाच्या धाकाने लुटमार करणारे तिघे गजाआड

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड परिसरात पिस्तूलाचा धाक दाखवून लूटमार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Pune Pimpri Crime) केली असून, त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींकडून (Pune Pimpri Crime) 1 लाख 61 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भागात रिक्षाचालकांना पिस्तुलाचा धाक दाखवून काहीजण लुटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत संभाजी शिवाजी जाधव (वय 34, रा. पौड), दत्तात्रय ज्ञानोबा बलकवडे (वय – 45, रा. पौड) आणि सुनील बबन पवार (वय – 37, रा. माण – मुळशी) या तिघांना अटक केली आहे.

 

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी पिंपरीतील टिप टॉप हॉटेलसमोर एका नागरिकाला दुकाचीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण करुन लुटले.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना, अशाच वर्णनाच्या तिघांनी वाकड आणि डेक्कन परिसरात लुटमार केल्याचे पोलिसांना कळाले.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत तिघांचा माग काढला. 18 नोव्हेंबर रोजी हे तिघे माण – मुळशी या भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात आरोपींचे तीन गुन्हे उघड झाले आहेत.
तसेच त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Hinjewadi Police Arrest 3 Criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात