Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीतील बालेवाडी संकुलातील (Balewadi Complex) एका लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Business) अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने (Anti Human Trafficking Unit (AHTU)) पर्दाफाश केला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी लॉजवर छापा टाकण्याचे (Pune Pimpri Crime) आदेश दिले. या कारवाईत 4 महिलांची सुटका करुन 4 दलालांना (Agents) अटक (Arrest) केली आहे.

 

विजय साहेबराव थोरात Vijay Sahebrao Thorat (वय-31) राज उर्फ भागवत गुंडरे (Raj alias Bhagwat Gundre), निलेश मारवाडी उर्फ राजू (Nilesh Marwadi alias Raju), युसुफ सरदार शेख Nilesh Marwadi alias Raju (रा. तळेगाव दाभाडे Talegaon Dabhade) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune Pimpri Crime)

 

अनैतिक मानवता विभागाला बालेवाडी संकुलातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. शोध पथकातील (investigation Team) एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. याठिकाणी वेश्या व्यवसाय सरु असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली. महिलांनी तीन दलाल भागीदारांची नावे पोलिसांना दिली. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना मोबाईल व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे लॉजवर पाठवले जात होते.

सुटका करण्यात आलेल्या मुली उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पश्चिम बंगाल (West Bengal) येथून आणल्या होत्या.
पोलिसांनी या कारवाईमध्ये 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून
यामध्ये 4 हजार रुपये रोख, 35 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Hinjewadi Police Station Balewadi Complex Prostitution Business Anti Human Trafficking Unit AHTU

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा