Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोच्या मित्राचा भोसकून खून

पिंपरी : Pune Pimpri Crime | बायकोचे अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याचा संशयातून एका इसमाने तिच्या जवळच्या मित्राचा भोसकून खून (Murder) केला आणि त्याला दहाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करून महिलेचा पती पंकज शिंदे (Pankaj Shinde) याला अटक (Arrest) केली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव निलेश अशोक जोर्वेकर (Nilesh Ashok Jorvekar) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे तिच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी पंकज शिंदे याला होता. यामुळे तो या दोघांच्या मागावर होता. दोन दिवसांपूर्वी पंकजने मी गावी जात आहे असे पत्नीला सांगितले आणि तो घराबाहेर पडला. याच दरम्यान पंकजच्या पत्नीला तिचा मित्र निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. दरम्यान पाळत ठेवून असलेला पंकज एक दिवस अगोदरच गावावरून आला. त्याने घराबाहेरून पाहिले असता निलेश आणि त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या घरात जाताना दिसले. त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथे पंकज पोहचला. (Pune Pimpri Crime)

यानंतर निलेश आणि पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले.
या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. यानंतर संतापलेल्या पंकजने निलेशला घराच्या दहाव्या मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिले. यात निलेशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंकजला अटक करण्यात आली.

Web Title :- Pune Pimpri Crime | husband kills wifes friend on suspicion of extramarital affair in pimpri pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?

Winter Health Tips | सर्दी-तापापासून करायचा असेल बचाव तर आहारात करा ‘या’ 5 गोष्टींचा समावेश