Pune Pimpri Crime | पतीच्या विम्याचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवले, बिल्डरने घातला गंडा; अनेकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर पत्नीवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पतीच्या निधनानंतर त्याच्या विम्याचे मिळालेल्या पैशांतून (Insurance Money) तिने फ्लॅट खरेदी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला (Builder) दिले. त्याने मात्र गंडा घालून 20 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) करुन फरार झाल्याचा प्रकार (Pune Pimpri Crime) समोर आला आहे.

 

याप्रकरणी पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे राहणार्‍या एका 42 वर्षाच्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निवेदिता राहुल गायकवाड (Nivedita Rahul Gaikwad) आणि राहुल जयप्रकाश गायकवाड Rahul Jaiprakash Gaikwad (रा. ओंकार रेसिडेन्सी, पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. (Pune Pimpri Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे सप्टेंबर 2020 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले.
त्यांच्या विम्याचे फिर्यादी यांना पैसे मिळाले होते.
नवरात्रीच्या देवीच्या कार्यक्रमात फिर्यादी यांची निवेदिता गायकवाड हिच्याशी ओळख झाली होती.
तिला फिर्यादी यांच्याकडे पैसे असल्याची माहिती होती. तिने आमची मोरया पार्कमध्ये स्कीम (Morya Park Scheme) चालू आहे.
त्यात तु पैसे गुंतविले तर तुला स्वस्तात फ्लॅट देऊ, असे सांगितले. त्यांना ही स्किम आवडल्याने त्यांनी टोकन अमाऊंट म्हणून 5 लाख रुपये दिले.

त्यानंतर त्यांनी तुम्ही लगेच पैसे दिले तर स्वस्तात फ्लॅट देऊ असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 20 लाख रुपये घेतले.
तरीही त्यांना खरेदी खत करुन दिले नाही. त्यानंतर तिने फिर्यादी यांचा फोन घेणे बंद केले.
तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता घर बंद होते.
त्यांनी चौकशी केली असता या दोघा पतीपत्नींनी अनेकांना कमी किंमतीत फ्लॅट देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन ते निघून गेले आहेत.
त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Husbands insurance money invested in flat purchase builder cheating fraud case FIR against builder and his wife for cheating on several

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा