Pune Pimpri Crime | ‘पोलिसांना मी सरळ केले आहे…’, वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणारे दोनजण ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | वाहतुकीचे नियमन (Traffic Regulation) करत असताना पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. ही हिंजवडी पोलिसांची (Hinjewadi Police) हद्द आहे. हिंजवडी पोलिसांना विचार तू, इथल्या पोलिसांना मी सरळ केले आहे, असे म्हणत दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे शुक्रवारी (दि.16) चारच्या सुमारास घडला.

 

सचिन तानाजी राजपुत (वय-22 रा. मु.पो.कासार अंबोली, ता. मुळशी), अरुण बलराम रास्ते (वय-30) यांच्यावर आयपीसी 353, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस हवालदार श्रीकांत जाधव Police Constable Shrikant Jadhav (वय-41 रा. निगडी प्राधिकरण) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाकड वाहतूक विभागात (Wakad Traffic Branch) कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ते पुनावळे अंडर पास येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन फिर्यादी यांनी शिवीगाळ केली. कुठला पोलीस आहेस. बाजूला हो. मला पुढे जाऊ दे, अशी दमदाटी केली.

फिर्य़ादी यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी रस्त्यात उभी केली.
तुला माहिती नाही का, ही हद्द हिंजवडी पोलीस ठाण्याची आहे.
हिंजवडी पोलिसाला विचार तू, इथल्या पोलिसांना मी सरळ केले आहे.
मी येरवडा जेलमध्ये (Yerawada Jail) जाऊन आलो आहे.
माझ्या नादी लागू नको, असे म्हणत शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | ‘I have straightened the police…’, two persons who abused the traffic police are detained

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन