Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | ‘येथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी (Ransom Case) द्यावीच लागेल’ अशी धमकी (Threat) देऊन कामाची साईट बंद पाडली. खंडणी मागणाऱ्या विशाल अमृत सोनवणे (Vishal Amrit Sonawane) याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) आयपीसी 384,504,506 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

याबाबत अनिल बाबुराव पवार Anil Baburao Pawar (वय-43 रा. चिखली-Chikhali) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 मार्च ते 13 मे या कालावधीत आकुर्डी (Akurdi) येथील पंचतारानगर येथे घडली. पोलिसांनी विशाल सोनवणे (रा. पंचतारानगर, आकुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.(Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पंचतारा नगर (Panchtara Nagar) येथे कामाची साईट सुरु आहे.
फिर्यादी, त्यांचा सुपरवायझर निखील हरिभाऊ डोंगरे (Supervisor Nikhil Haribhau Dongre)
, मित्र नितीश मधुकर कांबळे (Nitish Madhukar Kamble) व कामगार यांना आरोपीने शिवीगाळ करुन दमदाटी केली.
‘तुला येथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी द्यावीच लागेल.
जर पैसे दिले नाहीत तर फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) आरोपीने दिली.’
तसेच फिर्यादी यांच्या कामाची साईट बंद पाडली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ (API Vijay Dhumal) करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | ‘If you want to work here, you have to pay a ransom’, FIR on one

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त