Pune Pimpri Crime | सराईतांचा पिंपरी चिंचवड शहरात दोन ठिकाणी गोळीबार; हवेत झाडल्या 8 गोळ्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या (Firing) घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले आहे. या घटना चिंचवड (Chinchwad) येथील पत्राशेड तसेच पिंपरी येथील भाटनगर (Bhatnagar) येथे मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडल्या आहेत. हवेत सात ते आठ गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे (Pune Pimpri Crime) शहरात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडी येथील सराईत गुन्हेगार (Criminal) शाहरुख शेख (Shah Rukh Sheikh) हा त्याच्या दोन साथीदारांसह एका रिक्षातून चिंचवड येथील पत्राशेड येथे आला. त्याने या ठिकाणी हवेत गोळीबार केला. त्यानंतर भाटनगर येथे जाऊन हवेत दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार करण्यापूर्वी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवला, तर एकाचा मोबाइल हिसकावला. (Pune Pimpri Crime)

गोळीबाराच्या घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकलेलं नाही. घटनास्थळी पिंपरी पोलीस, चिंचवड पोलीस, गुंडाविरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट (Crime Branch) दाखल झाले आहेत.

 

दरम्यान, आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvana Divas) असल्यामुळे शहरात ठीक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
असे असताना भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगाराचा खून (Murder) झाला होता.
त्यावेळी गोळीबार करण्यात आला होता. शहरामध्ये गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | in spite of police presence in pimprit indiscriminate firing by criminals pune Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार