×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | चिटफंडच्या नावाखाली व्यावसायिकाची साडेसहा लाखांची फसवणूक, भोसरी येथील...

Pune Pimpri Crime | चिटफंडच्या नावाखाली व्यावसायिकाची साडेसहा लाखांची फसवणूक, भोसरी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | चिटफंडमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 6 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॅक्स केअर कुरीज इंडिया प्रा. लि. चिटफंडाच्या संस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 2016 ते 2019 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी येथे घडला आहे.

याप्रकरणी शिवजी देवजी पटेल (वय-55 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी मॅक्स केअर कुरीज इंडिया प्रा. लि. चिटफंडाचा संस्थापक युवराज रणदिवे याच्यावर आयपीसी
420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ( Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज रणदिवे हा मॅक्स केअर कुरीज इंडिया प्रा. लि. चिटफंडाचा
संस्थापक आहे. त्याने फिर्यादी यांनी चिटफंडमध्ये पैसे गुंतवल्यास चांगल्या परतावा देण्याचे आमिष दाखवले.
आरोपीने 2016 ते 2019 या कालावधीत फिर्यादी यांच्या कार्यालयातून मयुर या व्यक्तीकरवी आयडीबीआय
बँकेचे 39 धनादेश घेतले. त्याद्वारे आरोपीने 6 लाख 60 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना
कोणताही परतावा न देता पैशांचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी भोसरी पोलीस
ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Crime | In the name of chit fund fraud of a businessman of six and a half lakhs, an incident in Bhosari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस

 

Must Read
Related News