Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगून रुम (पीजी) मालकाला (P.G. Owner) दमदाटी करुन मारहाण (Beating) केल्याची घटना हिंजवडी मध्ये घडली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत नक्षत्र पी.जी. नारायण नगर हिंजवडी (Hinjewadi) येथे घडला आहे.

साजीद मंसुर पेंढारी Sajid Mansoor Pendhari (वय-23 रा. नारायण नगर, हिंजवडी, मुळ रा. मु.पो. खोची, ता. हातकणंगले-Hatkanangale) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल नामदेव राठोड Rahul Namdev Rathod (वय-29 रा. साकला प्लॉट, लोहगाव रोड, ता. परभणी-Parbhani) याच्यावर आयपीसी 323, 170, 504, 506 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ( Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पी. जी. व्यवसाय करतात.
ते राहत असलेल्या ठिकाणी विकी चव्हाण (Vicky Chavan) याच्यासोबत ओळख झाली.
विकी याने फिर्यादी यांची त्याचा मामा राहुल राठोड सोबत ओळख करुन दिली.
आरोपीने फिर्यादी यांना पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर नोकरी करत होतो असे
सांगितले. मात्र, स्टेशन हाऊस इन्चार्ज (Station House Incharge) असताना आमच्या ताब्यातील एका आरोपीचा लॉकपमध्ये मृत्यू झाला.
त्यामुळे माझ्यावर डेथ इन कस्टडी (Death in Custody) झाली आणि पोलीस खात्यातून निलंबित (Suspended) केल्याचे आरोपी राठोड याने फिर्यादी यांना सांगितले.

तसेच निलंबित केल्यामुळे हिंजवडीमध्ये नोकरीच्या शोधात आलो असल्याचे भासवून विनाकारण फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली.
तसेच फोन करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. पोलिसांची पिंजऱ्याची गाडी बोलावून तुला जेलमध्ये टाकतो, असे म्हणत पोलिसांची भीती दाखवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके (PSI Khadke) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Incident in Hinjewadi area, beating up PG owner claiming to be a suspended policeman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis| ‘बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी’